Posts

Showing posts from September, 2020

K. A. Nilakanta Sastri

Image
K. A. Nilakanta Sastri Kallidaikurichi Aiyah Nilakanta Sastri                 (12 August 1892 – 15 June 1975)                   👉 was an Indian historian who wrote on South Indian history .  👉 Many of his books form the standard reference works on the subject .  👉Sastri was acclaimed for his scholarship and mastery of sources and was a recipient of the third highest Indian civilian honour of  Padma Bhushan . Kallidaikurichi Aiyah Nilakanta Sastri Born 12 August 1892 Kallidaikurichi ,  British India Died 15 June 1975(aged 82) Madras ,  India Alma mater Madras Christian College Spouse(s) Lakshmi Narasammal Awards Padma Bhushan (1957) Scientific career Influences S. Krishnaswami Aiyangar Career Nilakanta Sastri was born in a  Telugu   Niyogi Brahmin  family, [1]  in  Kallidaikurichi  near  Tirunelveli , on 12 August 1892. [2] ...

प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग

Image
प्राचीन भारतीय चित्रकलेतील रंग  - बोधसूत्र | BodhSutra सतराव्या शतकातली, हिमाचल मधल्या गुलेर या लहानशा गावातली एक सकाळ. तिशीच्या वयातला तरुण, शिडशिडीत चित्रकार नैनसुख, दगडाळ, तीव्र उताराच्या रस्त्यावरुन मार्गक्रमणा करतो आहे, रावीच्या खळाळत्या, वेगवान पात्राच्या वाहत्या दिशेने. सपाटीवरच्या जसरोटा संस्थानाच्या दरबारात लघुचित्रकार म्हणून रुजू होण्याकरता तो निघाला आहे. राजकीय उलथापालथ, नवे काम मिळवणे अशा अनेक कारणांनी लघुचित्रकार स्थलांतरित होत होते. नैनसुखच्या हातातल्या काठीला लटकवलेली एक पडशी आणि पोटाशी घट्ट कवटाळलेली एक लाकडी पेटी ज्यात त्याचे सर्वस्व आहे. खारीच्या पोटावरल्या केसाचा पातळ कुंचला आणि रंगांची भुकट्या ठेवलेल्या काही लाकडी, काही शंखांच्या डब्या. डब्यांमधे राजवर्ती निळा, हिरवट राखाडी मालकाईट, चमकदार मातकट तपकिरी, जर्द कुशुंबी लाल, उजळ पिवळा, काळाशार अशा रंगांसोबत काही झळाळती सुवर्ण पाने, रजत भस्म सुद्धा आहेत. गुलेरमधल्या आपल्या वडिलांच्या, प्रख्यात लघुचित्रकार पंडित शिऊ यांच्या कारखान्यात कित्येक दिवसांच्या परिश्रमातून, दगडांची चूर्णे, वनस्पतींची पाने-फ़ुले-बिया-मुळ्या, भ...

भारतीय हस्तचित्रित नकाशांमध्ये शिवाचे चित्रण

Image
भारतीय हस्तचित्रित नकाशांमध्ये शिवाचे चित्रण - बोधसूत्र | BodhSutra जोधपूर शिवरहस्याचे सखोल संशोधन आणि विकास : इ.स. 1827 च्या आसपास जोधपूरच्या दरबारी कलाकारांनी  शिव रहस्य  नामक एक भव्य सचित्र हस्तलिखित ग्रंथ तयार केले, जे कदाचित भारतीय दरबारी चित्रकलेच्या इतिहासामध्ये या पूर्वी कधीच चित्रित केले गेले नव्हते. जोधपूरच्या महाराजा मानसिंग (इ.स. 1803-43) यांनी स्वतः चित्रकारांना या भव्य कामासाठी नियुक्त केले. हे चित्रे त्याच नावाच्या मजकूरावर आधारित आहेत, जी भगवान शिव यांच्या नित्य कर्माशी व त्याचे गौरव पाठ करण्या संबंधित आहेत, ज्याला  tour de force  असे देखील म्हणतात. मानसिंह हे नाथ संप्रदायाचे उपासक होते व त्याचे कठोर पालन करत. यासाठी त्यांनी दरबारातील चित्रकारांना  शिव रहस्य  चित्रित करण्यास प्रोत्साहन दिले. तेजस्वी रंग, चमकणारे सोने, दाट पर्णसंभार आणि भगवान शिव यांच्या विश्वाच्या दृश्यमय शब्दावलीमध्ये विणलेल्या चित्रित नकाशासारखी दृश्ये असे या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. एकूण 101 पुस्तकांपैकी (फोलिओ) आपण विशेषत:  प्रथम-अंश  म्हणजेच पहिले पुस्...

तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व

Image
तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व - बोधसूत्र | BodhSutra Home   \   बोधसूत्र   \   तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व पौष महिना सुरु झाला की लगबग सुरु होते ती मकर संक्रांतीची.  तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला  म्हणत नात्यांमध्ये माधुर्य वाढवणारा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आत्ता जरी मकर संक्रांतीचे स्वरूप हे सणाचे असले, तरी हे भारतीय धार्मिक व्रतांपैकी एक व्रत होते. सध्या आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा करतो. दक्षिण भारतातही याच दिवशी पोंगल नावाचा सण साजरा केला जातो. संक्रांती प्रमाणे तीन दिवस चालणारा हा पोंगल म्हणजे तमिळ वर्षाचा पहिला दिवस असतो. भारतात सर्वत्रच आपले देशबांधव संक्रांत साजरी करतात. जम्मू-काश्मीरमध्ये शिशिर सेक्रांत, पंजाब मध्ये लोहडी, आसाममध्ये माघ बिहू, बंगालमध्ये पौष संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, महाराष्ट्रात मकर संक्रांत आणि तामिळनाडू मध्ये पोंगल अश्या विविध नावे आणि काही प्रादेशिक परंपरा यांचे वेगळेपण टिकवून हे उत्तरायण सर्वत्र तितक्याच आनंदाने साजरे केले जाते. संक्रांत याचा अर्थ सू...