Posts

Showing posts from January, 2022

पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!

Image
पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक! By   अशोक लिंबेकर   संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात. ‘पैसचा खांब’  अहमदनगर जिल्ह्यातील  नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन  ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’  असे केले आहे. ज्ञानदेवादी भावंडे  पैठणहून  शुद्धिपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. ती भावंडे जवळजवळ दोन वर्षें त्या ठिकाणी राहिली, कारण त्या गावी करविरेश्वराचे (महादेवाचे)  मंदिर  होते. त्याच मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव इत्यादी...

मराठा स्वराज्यातील वीर

Image
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास   Home   ▼ WEDNESDAY, 4 AUGUST 2021 भोसले कुळाची कुळगाथा सांगणारी तीनमजली भव्य बारव - ऐतिहासिक नगरी श्रीगोंदा   भोसले कुळाची कुळगाथा सांगणारी तीनमजली भव्य बारव - ऐतिहासिक नगरी श्रीगोंदा संशोधन व लेखन प्रा.राजेश बाराते भव्य वाड्याचे व प्राचीन मंदिराचे मध्ययुगीन नगर म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे.संशोधकांना ऐतिहासिक संशोधनासाठी या नगराचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीगोंदा हे नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पौराणिक संपन्न वारसा लाभलेले शहर होय. या शहराला ' श्रीपूर ' असे नाव होते. या श्रीपुरचे ' चाम्भारगोंदे' हेच आजचे श्रीगोंदा अशी विविध नामभिधाने प्राप्त झाली आहेत. श्रीगोंदा शहराला दक्षिण काशी असे म्हटले जाते कारण विठ्ठल मंदिरात प्रति पंढरपूर असा शिलालेख आहे,तसेच ११३ प्राचीन मंदिर हि या ठिकाणी आहे. पुरातन मंदिरे त्यात यादव,मराठापूर्व,मराठाकालीन मंदिरे पाहिल्यास श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष नक...