Posts

Showing posts from December, 2021

कलावंतीन महाल भातोडी

कलावंतीन महाल भातोडी। निजामकलीन सैनिकी प्रशिक्षन केंद्र अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम सर्व इतिहासप्रेमीना माहित आहेच, निजामशहा कडून लढताना, #सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य, #शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध. . या युद्धामध्ये मूळ जुना तलाव फोडला गेला त्यानंतर ब्रिटिशांनी आज अस्तित्वात असलेला भातवडी तलाव बांधून काढला, या युद्धात #शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले . याच गावात मेहेकरी नदीच्या काठावर #आदिलशहाचा #पेशवा कान्होजी नरसो याने बांधलेले (साल १४४०) नरसिंहाचे उत्तम स्थापत्यशास्त्राचे उदाहरण असलेले मंदिर आहे, मंदिरावर मुस्लिम स्थापत्यशैलीची प्रभाव दिसून येतो . याच #भातोडी गावाच्या जवळ वडगाव दौलाच्या सीमेवर उभारलेले कलावंतीन महाल आहे (१५०८-१५४३), बुरहान शहा या निजाम राजाने आपल्या काळात या वास्तूची निर्मिती...

मुस्लिम आक्रमणापूर्वी भारतात सर्वात शक्तिशाली राजा आणि साम्राज्य कोणते होते ? त्याचा विस्तार आणि अस्त कसा झाला ?

Image
मुस्लिम आक्रमणापूर्वी भारतात सर्वात शक्तिशाली राजा आणि साम्राज्य कोणते होते ? त्याचा विस्तार आणि अस्त कसा झाला ? गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर  हर्षवर्धन  या  कनौज  च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली. त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली. १३ व्या शतकातले  विजयनगरचे साम्राज्य  हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात  शंकराचार्यांनी  प्राचीन  अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले. आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात  राष्ट्रकूटांचे  राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात माल...