पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!
पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक! By अशोक लिंबेकर संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे म्हणतात. ‘पैसचा खांब’ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावाच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन ‘त्रिभूवनैक पवित्र | अनादी पंचक्रोश क्षेत्र | जेथे जगाचे जीवनसूत्र | श्री महालया असे ||’ असे केले आहे. ज्ञानदेवादी भावंडे पैठणहून शुद्धिपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. ती भावंडे जवळजवळ दोन वर्षें त्या ठिकाणी राहिली, कारण त्या गावी करविरेश्वराचे (महादेवाचे) मंदिर होते. त्याच मंदिरातील या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव इत्यादी...
Comments
Post a Comment