बहामनी साम्राज्याने केलेल्या अन्यायामुळे मराठा स्वराज्य निर्माण ल सुरुवात झाली अस म्हटले तर गैर ठरणार नाही. या पाच शाही मधील तीन शाही तर औरंग्याने स्वतःच्या हाताने संपवाल्या. (आदिलशाही, कुतुबशाही आणि बरीदशही) . या पाच शाह्यानी मिळून विजयनगर चे हिंदूंचे साम्राज्य संपवले .
पूर्वेतिहास
१३३७ मध्ये दिल्लीतील मुहंमद तुघलक काळात अनेक मुस्लिम सरदार बंड करू लागले.त्यात इस्माईल मख नावाच्या सरदाराला सुलतान पदास आवाहन दिले .ते बंड मोडायला मुहंमद तुघलक मोठ्या फौजेनिशी दख्खन मध्ये उतरला.त्याने इस्माईल मखचा दौलताबादला हरवले .पण त्याचं वेळी उत्तरेत देखील बंड चालू झाले आणि त्याला तिकडे जावे लागले.त्याची काही फौज दख्खन येथे राहीली.तेंव्हा सरदार हसन गंगू याने त्या फौजेचा पराभव केला.तेंव्हा इस्माईल मख ने सुलतान पद सोडले व सर्व सरदारांनी मिळून हसन गंगू ला सुलतान म्हणून घोषित केले.
मुळ बहामनी सत्तेचा उदय
हसन गंगू ने अबुल मुझफ्फर अल्लाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण केले.आणि ३ आॅगस्ट १३४७ ला बहमनी साम्राज्याची स्थापना करत त्याने स्वतःला दक्षिणेचा सुलतान म्हणून घोषित केले.त्याची पहिली राजधानी ही कर्नाटकात गुलबर्गा येथे होती. काहींच्या मते म्हणजे तबकात-इ-अकबरी या ग्रंथानुसार इस्फंदयारचा मुलगा बहमन व त्याचा मुलगा हसन गंगू. काहींच्या मते इराणचा प्राचीन राजा बहमन याचा हसन गंगू हा त्याचा वंशज होता.तर काहींच्या मते हसन गंगूचा मालक एक ब्राह्मण होता म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.त्याने कल्याणी ,बिदर, गुलबर्गा या क्षेत्रात राज्यविस्तार केला.
त्याची सत्ता उत्तरेस मंडूपर्यंत म्हणाजे नर्मदा नदीपासून , दक्षिणेत रायचूर पर्यंत पुर्वेला भोंगी पर्यंत व पश्चिमेस दाभोळपर्यंत प्रस्थापित केली होती.
त्याने राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी आपल्या साम्राज्याची गुलबर्गा, दौलताबाद ,बरार व बिदर या चार सुभ्यात विभागनी केली आणि तिथेच या बहामनी साम्राज्याची दुहीचे बीजे रोवली गेली.
बहामनी साम्राज्याची शकले
बहमनी साम्राज्याचे मुख्य शत्रू हे विजयनगर साम्राज्य होते.त्याच काळात हरिहर आणि बुक्का यांनी स्थापन केलेले साम्राज्य विकसित होत होते. हसन गंगू ११फेब्रुवारी१३५८ रोजी मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा मुहंमदशहा गादीवर आला.१४२५ मध्ये बहमनींनी आपली राजधानी गुलबर्गा वरून बिदर येथे हलवली.याच नंतर तिसर्या मुहंमद शहाच्या वेळी त्याचा मुख्यमंत्री महमूद गवां याने अमुलाग्र बदल घडवून आणले.महम्मद गवान ह आतिशय हुषार. त्याने राज्याचे विभाजन आठ सरलष्करात( सुभ्यांत) केले.राज्यव्यवस्थेमध्ये महमूद गवां च्या तरफदारांचाचं दबदबा होता बहुतांश मंत्री हे त्यांचे बाजूने होते,विरोधकांनी महमूद गवां बद्दल मुहंमद शहाचे कान भरले व त्यामुळे त्यास फासावर चढवण्यात आले.
या घटणे मुळे राज्यात अस्थिरता निर्माण झाली व अंतर्गत बंडाळीस सुरुवात झाली. मध्यवर्ती सत्ता कमजोर बनताचं सुभेदार चे वर्चस्व वाढले आणि अखेरीस हे स्वतंत्र होऊन बहमनी साम्राज्याचे पाच स्वतंत्र शाह्यांत रुपांतर झाले.
१)सर्वप्रथम १४८४ ल बेरार वेगळं झालं.
२) त्यानंतर १४९० ला विजापूर युसूफ आदिलशहाद्वारे वेगळं करण्यात आलं व त्या शासनास आदिलशाही असे संबोधले जाते.
३) १४९० ला मलिक अहमद ने अहमदनगरचा स्वतंत्र तख्त स्थापन केला व त्या शाहीस निजामशाही म्हणून संबोधले गेले.अहमद निजाम शहा (१४९०-१५१०) याने राज्याचा विस्तार कोकणात चौल-रेवदंड्यापर्यंत, उत्तरेत खानदेशापर्यंत तर दक्षिणेत सोलापूरपर्यंत केला
४)१४९२ मध्ये काशिम बरीद ने बिदर वेगळे केले व त्याने बरीदशाही म्हणून आपला कारभार चालवला.
५)सर्वात शेवटी १५२२ मध्ये कुलीशहाने गोवळकोंडा वेगळा केला, व त्या शाहीस कुतुबशाही म्हणून संबोधले गेले.हैद्राबादचं चारमिनार कुली कुतुबशहानेचं त्याच्या कारकिर्दीत बनवून घेतलं.
बहामनी राज्य व नंतरच्या पाच शाह्या यांचे महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
बहामनी वंशाची सत्ता पंधराव्या शतकात सबंध महाराष्ट्रावर प्रस्थापित झालेली होती. बहामनी राज्यकारभारात परदेशी मुसलमानांचे वर्चस्व होते. सोळावे शतक त्या सर्व मुस्लिम राज्यांच्या आपापसांतील लढायांनी भरलेले आहे. विजयनगरच्या वाढत्या सामर्थ्यामुळे त्या राज्यांना शह बसला, पण सर्वांनी एक होऊन विजयनगरचा मोठा पराभव केला. त्यामुळे एक विशाल साम्राज्य नष्ट झाले आणि इतिहासाला कलाटणी मिळाली.
निजामशहा विरुद्ध विजयनगर आणि आदिलशाही आणि कुतुबशाही ,
निजामशाही मुत्सद्दीपणा
सत्तेत आलेल्या बुऱ्हान निजाम शहा- पहिला (१५१०-१५५३) याचा विजयनगर, विजापूर, गोवळकोंडा यांच्या एकत्र सैन्याने पराभव केला, पण निजाम शहाने त्याची मुलगी चांदबीबी हिचा विवाह विजापूरच्या आदिल शहाशी करून राज्य वाचवले.
विजयनगर शेवट
तालिकोट म्हणजे राक्षसतंगडी येथील जंगी युद्धात (१५६५) अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा हे शासक एकत्र आले व त्यांनी विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. त्यानंतर मुर्ताजा निजाम शहा सत्तेत आला. १५६५ च्या तालीकोटाच्या झालेल्या मोठ्या युद्धात बहामनी राजवटीतून फुटलेल्या ५ दक्खनी शाह्यांच्या सुलतानांनी एकत्र येऊन राम देवरायचा परभाव केला आणि विजयनगरची सत्ता संपवली.
शाही लुटीतून खालील खंजीर विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात आला . आदिलशाह बादशाह दरबारात तख्तावर बसताना सदर खंजर आपल्या हातात वागवत असत असे तत्कालीन आदिलशाही चित्रांवरून दिसून येते.
सध्या हा खंजीर लंडनच्या क्रीस्तीज संग्रहालयात आहे.
बरिदशही शेवट आणि निझाम शाहीच घरघर
मुर्ताझा निझाम शाह ने त्याच्या राज्यात बहामनी साम्राज्यातून निर्माण झालेले बरारचे राज्य विलीन केले. अकबर च मुलगा मुराद ने अहमदनगरवर स्वारी केली व शहराला वेढा दिला. चांदबीबी विजापूरचा आदिल शहा याच्या मृत्यूनंतर १५९४ साली तिच्या माहेरी अहमदनगरला परत आली होती. तिने मोठी पराक्रम दाखवत मोठ्या शहराचे रक्षण केले. तिने मोगलांच्या सैन्याची कत्तल केली व त्यांनी पाडलेला तट रातोरात पुन्हा बांधून काढला. तेवढ्यात, विजापूरची फौज आल्यामुळे मुरादने तहाची बोलणी सुरू केली. चांदबीबीने त्याच्या मागणीप्रमाणे त्याला वऱ्हाड दिल्यावर तो वेढा उठवून निघून गेला. तिने मग १५९५ मध्ये बहादूर शहा नामक मुलाला गादीवर बसवले ( इब्राहिम निजाम शहाचा पुत्र) व स्वत: सर्व कारभार हाती घेतला.
पण मुगलांनी पुन्हा निजामशाहीवर स्वारी केली आणि बरारचा ताबा घेतला. दरम्यानच्या काळात, सत्ता-संघर्षात चांदबीबीची हत्या झाली. मुगलांनी निजामशाहीतील आपापसातील फायदा घेऊन १६०० मध्ये अहमदनगरवर ताबा मिळवला व बहादूर निजाम शहास बंदी बनवले.
मलिक अंबरने त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर मुर्तजा निजाम शहा- दुसरा यास गादीवर बसवून निजामशाहीस पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तो निजाम शहाचा पेशवा बनला. त्याने १६१०मध्ये मुर्तजा निजामशहा - तिसरा यास गादीवर बसवले. त्याने त्याच्या ताब्यात मुगलांनी निजामशाहीतून जिंकून घेतलेले सर्व प्रदेश विजापूरच्या आदिल शहाच्या मदतीच्या जोरावर १६१० पर्यंत घेतले.
नंतर मुगलांनी निजामशाहीतील सरदारांना स्वत:कडे वळवले, विजापूरवर दबाव आणला व मलिक अंबरला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. १६२३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. पुढे शहाजी महाराजांनी निजामशाही वाचवण्याचा असफल प्रयत्न केला.
विजापूर
विजापूरच्या आदिलशाहीची स्थापना युसूफ आदिलशहाने केली.
त्याने विजापूरच्या आसपासच्या रायचूर, गोवा, दाभोळ, गुलबर्गा क्षेत्राचा ताबा घेऊन राज्याचा विस्तार केला. पण पोर्तुगीजांनी१५१० मध्ये गोव्याचा ताबा घेतला. युसूफ आदिल शहानंतर त्याचा मुलगा इस्माईल गादीवर बसला. इस्माईल आदिल शहाने बिदरवर स्वारी करून बिदरच्या शासकास कैद केले व बिदरचा ताबा घेतला. त्याचा मृत्यू १५३४ मध्ये झाला. अली आदिल शहा पहिला च्या काळात विजयनगर साम्राज्याचा बराच भाग विजापूरच्या ताब्यात आला. आदिल शहाची धार्मिक बाबींतील जिज्ञासा व त्याचे ज्ञान यांमुळे लोक त्याला सुफी संत समजत.
इब्राहिम आदिल शहा- दुसरा हा वयाने लहान असताना सत्तेवर आला. त्याने१६१९ मध्ये बिदर राज्याचा ताबा घेतला.
मराठ्यांची आक्रमणे, दरबारातील राजकारण व मुगलांचे औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील आक्रमक धोरण यामुळे विजापूरचे राज्य विभागले गेले. औरंगजेबाने विजापूर राज्याचा ताबा १६८६मध्ये घेतला.
बरीदशाही (१४९२-१६५६) - बरीद घराण्याची सत्ता बहमनी वंशाचा अंत झाल्यानंतर राजधानी बीदर येथे चालू राहिली. कासीम बरीद हाच १४९२ पासून खरा सुलतान होता. त्याचा मुलगा अमीर बरीद याने १५०४पासून १५४९पर्यंत सत्ता गाजवली. मात्र बहामनी सुलतान १५३८पर्यंत नामधारी राजे राहिले होते. अमीर बरीदनंतर मात्र अली बरीद याने शहा हा किताब धारण केला. पण अहमदनगरच्या निजाम शहाने त्याच्या राज्याचा बराच भाग जिंकून घेतला. ते राज्य हळूहळू लयाला गेले व १६५६साली मोगलांचा दक्षिणेकडील सुभेदार औरंगजेब याने बीदरचा किल्ला व शहर हस्तगत करून बरीदशाही नष्ट केली.
इमादशाही (१४८४-१५७२)- फत्तेउल्ला इमाद शहा हा मूळचा विजयनगरचा रहिवासी ब्राम्हण होता. तो मुसलमान झाल्यावर त्याला वऱ्हाडची सुभेदारी व इमाद-उल्मुल्क ही पदवी मिळाली. तो १४८४मध्ये स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला. पण तो त्याच वर्षी, मरण पावला. बुऱ्हाण शहा वयाने लहान असतानाच गादीवर आला होता. त्या वेळी तोफलखान नामक सरदाराने सर्व अधिकार बळकावला. पण १५७२साली मुर्तझा निजाम शहाने वऱ्हाडवर स्वारी करून इमाद शहा व तोफलखान यांना ठार मारले आणि वऱ्हाडचे राज्य निजामशाहीला जोडले.
कुतुबशाही - गोवळकोंड्याचा सुभा म्हणजे बहमनी राज्याचा पूर्वेकडील भाग, महमूद गवाँ याने कुली कुत्ब-उल्मुल्क याला तेथे सुभेदार नेमले होते. तो इराण वरून आला होता व त्याच्या कर्तबगारीने सुलतान महंमद शहाच्या दरबारात वर चढला होता. त्याने कासीम बरीदचा अंमल सहन न झाल्यामुळे १५१२ मध्ये गोवळकोंडा येथे स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला. तो पराक्रमी होता, त्याने त्याच्या राज्याचा पूर्व समुद्रापर्यंत विस्तार केला. त्याने विजयनगर, बरीदशाही व आदिलशाही यांच्याशी अनेक युद्धे केली व त्यांचा पराभव केला. त्याने १५४३ पर्यंत चांगला कारभार केला. पण शेवटी, त्याचा खून झाला.
अब्दुल्ला हुसेनच्या मागून त्याचा जावई अबू हसन गोवळकोंड्याच्या तख्तावर बसला. त्याचा वजीर मदनपंत नामक एक ब्राह्मण होता. त्याने राज्यव्यवस्था चांगली ठेवली, पण सेनापती इब्राहिम खान याला त्याचे वर्चस्व सहन झाले नाही. औरंगजेब १६८३ साली दक्षिणेत आला, तेव्हा इब्राहिम खान त्याला फितूर झाला. मदनपंत त्या वेळच्या गडबडीत मारला गेला. अबू हसन याने मोठी खंडणी देऊन मोगलांशी तह केला.
याचं काळात अनेक मराठा सरदारांनी मैदाने गाजवतं नावलौकिक मिळविला.
व अवघ्या विश्वात प्रेरणा म्हणून मराठ्यांचा इतिहास अजरामर झाले.
- Bahamani empire :-Sen
Comments
Post a Comment