ईट ची प्राचीन वास्तू कळातणीचा महल नव्हे,

ईट ची प्राचीन वास्तू कळातणीचा महल नव्हे,
👇👇👇
राजेसाळुंखे चाळुक्य निर्मित प्राचीन मंदिर वास्तू


------------------
---------------..............✍️
सतीशकुमार सोळंके- देशमुख,

ईट येथील उत्तरकालीन कल्याण साळुंखे चाळुक्यांच्या अर्धवट राहिलेल्या मंदिर वास्तूच्या गैरसमजाविषयी आजच्या दिव्य मराठी वर्तमानपत्राने बातमीवजा लिखाण करून सदरील वास्तूचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. खरतर हा कलावंतीणीचा महाल नसून हे राजे साळुंखे चाळुक्य निर्मित अर्धवट राहिलेले मंदिर असल्याचे लिखाण मी गेल्या चार वर्षांपूर्वीच माझ्या फेसबूक वॉलवर मोठा लेख लिहून केले होते. ही वास्तू अपूर्ण राहिलेल्या मंदिराची असल्याचे कोणापण प्राचीन वास्तु अभ्यासकांच्या सहज लक्षात येते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट, तालुका भूम येथील पाथरूड रस्त्यावर असणाऱ्या उत्तरकालीन कल्याण राजे साळुंखे चाळुक्यांच्या निर्मितीतील अर्धवट राहिलेल्या या वास्तूवर प्रकाश टाकणारा लेख मी माझ्या फेसबूक वॉलवर ८ जुलै २०१७ रोजी लिहिला होता. या वास्तूबद्दल अनेक तर्क कुतर्क लावून ही वास्तू कळातणीचा महाल म्हणून या भागात प्रसिद्धीस आली होती. ही वास्तू कळातणीचा महाल नसून ही वास्तू राजे साळुंखे चाळुक्य निर्मित अपूर्ण मंदिर वास्तू असल्याचे मी सदरील लेखांमध्ये सविस्तर लिहिले होते.
दैनिक दिव्य मराठी वर्तमानपत्राने इतिहास अभ्यासकाच्या हवाल्याने ही वास्तू चाळुक्य निर्मित असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे चाळुक्य निर्मित असल्याचे वास्तव सत्य आज नवनवीन इतिहास अभ्यासकांच्या लक्षात येणे, हा सत्य इतिहासाचा विजय आहे. सत्य वार्तांकन केल्याबद्दल दिव्य मराठी पत्रकार इतिहास अभ्यासक आणि दिव्य मराठी वर्तमानपत्राचे अखिल भारतीय राजे साळुंखे चाळुक्य राजवंश प्रतिष्ठान परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन...
म्हणतात ना, 'सत्य पराजित नही होता....' या उक्तीप्रमाणे गेल्या काही दशकापासून दगडावर दगड मांडण्याचा कुठेही पुरावा नसलेल्या थोतांड(!) हेमाद्रीला मंदिर निर्माणाचे क्रेडिट देणाऱ्या इतिहास अभ्यासकांच्या तोंडावर ही जबरदस्त चपराक आहे. राजे साळुंखे चाळुक्यांचा इतिहास कितीही दाबला तरी हा सत्य इतिहास फुटून बाहेर निघेल, हे आमचे गेल्या अनेक वर्षापासूनचे मत आहे. केवळ 'पंत' आहे म्हणून कसलाही अभिलेख अथवा प्रथम दर्जाचा पुरावा नसताना इतिहासकारांनी हे श्रेय विनाकारण हेमाद्रीला देणे हे इतिहासाचा गळा घोटण्यासारखे आहे!
राजे साळुंखे चाळुक्य निर्मित मंदिरांचे श्रेय हेमाद्रीला देण्यासाठी इतिहासकारांना मोठीच कसरत करावी लागणे हसू येण्याजोगे वाटते! त्यासाठी राजे साळुंखे चाळुक्य निर्मित या मंदिरांचा काळ दिड दोनशे वर्षांनी पुढे सरकवून केवळ 'ब्राह्मण' आहे म्हणून या मंदिर निर्माणाचे श्रेय हेमाद्री पंताला देण्यासाठी इतिहासकारांत चढाओढ लागणे हे इतिहासाला काळीमा फासण्याजोगे वाटते!

टीप :
पेपर कात्रण साभार :
Professor Dr. Varsha Mishra,
Lonar.

------------
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe ),
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------

@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड.
👉9422241339,
👉9922241339.

Comments

Popular posts from this blog

पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!

कलावंतीन महाल भातोडी

इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई