खर्डा एक ऐतिहासिक शहर.
खर्डा एक ऐतिहासिक शहर.
सरलष्कर सुलतानजी नाईक निंबाळकर यांनी खर्ड्याचा किल्ला (तालुका- जामखेड, जिल्हा-अहमदनगर) 1743 मध्ये बांधून आजूबाजूच्या परिसरातील जहागिरी सांभाळली. हे प्रथम शाहू महाराज यांचे सरदार होते. निंबाळकर कुटुंब इथे अनेक वर्षे इथे वास्तव्यास होते.सुलतानजींनी खर्डा या ठिकाणी भव्य स्वरूपातील किल्लेवजा गढी बांधली. याच्या प्रवेशद्वारावर शिलालेख याप्रमाणे आहे. 'उत्तम व गुणवान अमिर व साहेब मरतब राजा सुलतानजी निंबाळकर देशमुख देशपांडे मोकदम महाजन सेटे वगैरे कसबे सिवपट्टणम परगणे जामखेड सरकार अहमदनगर खुजिस्ता बुनियाद औरंगाबाद याचे कारकीर्दीत किल्ला सुलतान दुर्ग कसबे मजकूरची हद्द तारीख २५ माहे शाबान सन ११४६ फसली बरहुकूम माहे हिजरी ११५६ सन मध्ये तयार झाला.' त्यानुसार ३ ऑक्टोबर १७४३ रोजी खड्र्याचा किल्ला बांधून पूर्ण झाला. आपल्या नावावरून त्याला सुलतानदुर्ग हे नाव दिले. याच ठिकाणी १७९५ मध्ये मराठे आणि निजाम यांच्यात इतिहास प्रसिद्ध अशी लढाई झाली. कुठल्याही लढाईला गावावरून नाव पडते. त्यानुसार या लढाईला खड्र्याची लढाई म्हटले जाते. दोन्ही बाजूंचे मिळून २ लाखांची फौज या परिसरात लढली. मराठ्यांच्या भीतीने निजामाने याच किल्ल्यात आश्रय घेतल्यामुळे तो वाचला. पुढे १९४७-४८ च्या स्वातंत्र्य संग्रामात याच किल्ल्याच्या आश्रयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांना सळो की पळो करून सोडले होते. आजही किल्ल्याची तटभिंत अगदी सुस्थितीत आहे. याच सुलतानजींनी खर्डा गावात महादेवाचे मंदिर ,12 ज्योतिर्लिंगआणि त्यासमोर बांधलेला बारव पाहण्यासारखा आहे. तर तेथून जवळच असणाऱ्या ईट गावातही त्यांनी बेलेश्वराचे अतिशय देखणे मंदिर बांधलेले आहे.सन1795 मध्ये खर्ड्याची लढाई निजाम व मराठे यांच्यामध्ये झाली. यामध्ये निजामाचा दारूण पराभव झाला.सदर लढाईत शिदोजी राव नाईक निंबाळकर(भाळवणी) यांनी आपले बंधू सुलतानजी नाईक निंबाळकर उर्फ आप्पासाहेब(2) यांना सहकार्य करून दोन्ही भावंडे एकत्र येऊन निजामाविरुद्ध लढले.या लढाईमध्ये आप्पासाहेब निंबाळकर धारातीर्थ पडले. त्यांची समाधी खर्डा येथील गावांमध्ये आहे. खर्डा या ठिकाणी लढाई दरम्यान बराच रक्तपात झाल्याने निंबाळकरांनी सदर ठिकाणचे वास्तव्य सोडले.काही उर्वरित घरे हे भाळवणी तालुका-आष्टी. जिल्हा- बीड येथे स्थायिक झाले. तर काही घराणे हे पुन्हा सातारा,सांगली या भागात गेले व त्यांना छत्रपती शाहू यांच्या मार्फतीने खर्डेकर ही पदवी मिळाली.
_शार्दुलराजे निंबाळकर
१० जून रोजी २:४५ PM वाजता · Facebook for Android · सार्वजनिक
Sanjeev Survase
या लढाई बद्दल इतिहास जाणून घ्यायचा असेल तर "खर्ड्याची लढाई" हे पुस्तक वाचा, त्यामधे सर्व इतिहास छान पैकी दिलेला आहे..
३ · ११ जून
1 प्रत्युत्तर
Shardul Naik-Nimbalkar
Dhananjay Jawalekar Aapasheb Nimbalkar yaani nijamavirodha ladha dila...Te Shahu yaanchya pakshyat hote..
१० जून
Vinayak Jadhav
छान माहिती. ऐतिहासिक पार्श्वभूमीची ओळख सर्व मित्र परिवारात व्हायला हवी. राम राम
२ · ११ जून
Sanjeev Survase
बेलेश्रर मंदिर ईट येथे नाही तर ते मुंगेवाडी आणि पखरुड या दोन गावामधे आता च्या नगर उस्मानाबाद जिल्हा सिमेवर आहे. खर्डा पासुन 8 km वर आहे
बेलेश्रर पासुन ईट हे 7 km दुर आहे.
५ · ११ जून
Dhananjay Jawalekar
निंबाळकर निजामाच्या अंकित होते 1795 ला मराठा कडून ते लढले नाहीत
१ · १० जून
४ प्रत्युत्तरे
Hitesh Sangita
छान माहिती. शेवटची लढाई कोणी जिंकवली, किल्लेदार कोण होते कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकली... हा इतिहास पण समोर यायला हवा, आणायला हवा....
१ · १० जून
Shardul Naik-Nimbalkar
Thanks खर्डा एक ऐतिहासिक शहर.
१० जून
Katare Sheshrao
छान माहिती.
११ जून
Anant Walke
एकदम मस्त
Comments
Post a Comment